लोणी काळभोर प्रतिनिधी – दिनांक १७/१०/२०२५ रोजी सकाळी १०•०० वाजता राजेंद्र बबनराव काळभोर (वय ५५ वर्षे रा. लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) यांनी त्यांची दुचाकी अँक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही लोणी काळभोर येथील स्मशानभुमीसमोर पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी गाडी चोरुन नेली होती. या बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवीणेत आला होता.
या गुन्हयाच्या तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथक अधिकारी सहाय्यकपोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या पथकाने सतत ४ दिवसांमध्ये सुमारे १६५ कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी बिबवेवाडीच्या दिशेने चोरीची मोटारसायकल घेवुन गेल्याचे निदर्शनास आले. त्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी या भागामध्ये कौशल्यपुर्णरित्या आरोपीचा शोध घेतला असता आरोपीचा ठावठिकाण्याबाबत त्यांना माहिती मिळाली . त्यानुसार सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीसांनी सापळा रचुन आरोपीस दि. २८/१०/२०२५ रोजी ताब्यात घेवुन अटक केली आहे.
अटक करण्यात आल्यानंतर लोणी काळभोर पोलीसांनी आरोपीकडे तपास केला असता त्याचे नाव अरुण बाबुराव देशमुख ( वय ६७ वर्षे रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, पुणे )असे असल्याचे निष्पन्न झाले असुन त्याच्याकडुन गुन्हयात चोरीस गेलेली अँक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही दुचाकी जप्त करण्यातआली आहे. आरोपी हा चोरीचे गुन्हे करण्यात सराईत असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या पथकाने आरोपीच्या घराची दि. २९/१०/२०२५ रोजी पंचांसमक्ष घरझडती घेतली. घरझडती दरम्यान नमुद आरोपीच्या राहते घरातील एका बॅग मध्ये एक अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर), १० जिवंत काडतुसे व बनावट चाव्या मिळुन आल्या आहेत. सदर रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे व ३० बनावट चाव्या पंचांसमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त करणेत आले आहेत.
सदर गुन्हा अज्ञात आरोपींविरुध्द दाखल असताना, तसेच आरोपीतांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना देखील, लोणी काळभोर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपुर्णरित्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन, त्यास गुन्हयात अटक करुन, त्याच्या कडुन गुन्हयातील चोरीस गेलेली दुचाकी तसेच घरझडती दरम्यान रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे व ३० बनावट चाव्या असा एकुण ६५०००/- रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
सदरची उत्कृष्ठ कागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस अंमलदार सातपुते, शिरगिरे, कुदळे, पाटील, माने, विर, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, दडस, गिरी, यांनी केली आहे.
लोणी काळभोर पोलीस दुचाकीचा शोध घेत असताना चोरटयाकडे तपास करताना किती खोल तपास केला .त्यामुळे एक अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर),व १० जिवंत काडतुसे
सापडली आहेत. यावरून लोणी काळभोर पोलिसांचे परिसरातुन अभिनंदन होत आहे.



















